रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

चिऊताई

                                 चिऊताई 
एकदा पडक्या पण ऐतिहासिक वाडयाला आग लागली . बरेच जन आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते . कोणी मातीनी ..... तर कोणी पाणी टाकून आग विझविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत होते .त्याच वाड्यात राहणारी चिऊताई देखील आपल्या चोचीत पाणी भरून त्या ज्वालांवर सोडीत होती .किती तरी वेळा तिच्या फेऱ्या सुरूच होत्या . थकली होती पण तिचे कार्य तिने सुरूच ठेवले होते .अखेर कावळे दादांनी तिला विचारले अग अग चिऊताई ... काय करते आहेस ? तुझ्या चोचीत किती पाणी मावते ? तुझ्या चोचभर पाण्याने आग काय विझणार आहे का ग ?  त्यावर चीउताई नी  कावळे दादांना दिलेले उत्तरानी कावळे दादांची भंबेरी उडाली बरे . चिऊताई म्हणाली .... कावळेदादा  कावळेदादा मी माझे कर्त्यव्य पार पाडते आहे . माझ्या चोचभर पाण्याने आग विझेल या न विझेल हे मला ठाऊक नाही . परंतु जेव्हा या वाड्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मात्र चिऊ चे नाव त्यांत लिहिले जाईल . या वाडयाने मला कितीतरी वर्षे  आसरा दिला . त्या वाड्याचे मी काही तरी देणे लागते म्हणून मी माझ्या परीने मदत करीत आहे .उद्याचा इतिहास या चिऊताई चे नाव देखील आदराने घेईल बर का ....